पिस्टल बाळगणारे दोनजण पुणे पोलिसांकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हौसे खातर पिस्टल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्टल आणि जीवंत काडतूस असा एकूण 25 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कात्रज येथील गुजरवाडी फाटा येथे करण्यात आली. मनोहर रघुनाथ मांगडे (वय-४२ रा. मांगडेवाडी, ता. हवेली) आणि मारुती घोरपडे (रा. जांभुळवाडी ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कात्रज येथील गुजरवाडी फाटा येथे एक इसम कंबरेला पिस्टल खोचून उभा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे आणि कृष्णा बढे यांना मिळाली. पोलिसांनी गुजरवाडी फाटा येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पिस्टल आढळून आले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने हौसे खातर हे पिस्टल जांभुळवाडी येथील मारुती घोरपडे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी घोरपडे याचा शोध घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने 2015 मध्ये यादव नावाच्या बिहारच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या मनोहर मांगडे याच्यावर खुनाचा प्रयत्न तर घोरपडे याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात विनापरवाना शस्त्र बाळगण्याचा आणि बारामती येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे विष्णु ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, राहुल तांबे, गणेश चिचंकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव, योगेश सुळ यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –