PMPML चालकाला शिवीगाळ करणार्‍या दोघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरुन जाताना पीएमपीएल चालकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. शनिवारी मध्यरात्री तुकाराम शिंदे वाहनतळावर ही घटना घडली.

दलजित उर्फ अमित परमिंदर सबरवाल (वय 30 रा. रास्ता पेठ) आणि सुमित सुभाष वेळेकर (वय 25, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार गायकवाड (वय 30, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार पीएमपीएल बसमध्ये वाहक पदावर कार्यरत आहे. रविवार पहाटे तीनच्या सुमारास बसमध्ये होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दलजित आणि सुमितने त्यांच्याजवळ येउन तुझी बस इथे का उभी केली आहे, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जयंत पाटील अधिक तपास करीत आहेत.