युट्युबवर व्हीडीओ बघून गाड्या चोरणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मॅकेनिकलचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने युट्युबवर व्हीडीओ बघून दुचाकी चोरल्याची कबुली भारती विद्यापीठ पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ दुचाकी २ लॅपटॉप असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुजरवाडी फाटा येथे बुधवारी (दि.१२) रात्री सातच्या सुमारास करण्यात आली.

आकाश मोतीलाल कोटवाल (वय-२० सध्या रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे, मुळ रा. चारणेवाडी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. आकाशवर भारती विद्यापीठ, लोणी काळभोर, शिक्रापूर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच औरंगाबाद येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
[amazon_link asins=’B07BR3KDDP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed0e9dd2-b8cb-11e8-982c-dde7cdc133d0′]
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास  करत असताना आकाश कोटवाल हा गुजरवाडी फाटा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुजरवाडी फाटा येथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अटक केली. त्याच्याकडे असलेल्या होंडा शाईन दुचाकीची माहिती विचारली असता त्याने ती गाडी एक आठवड्यापूर्वी चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वाहन चोरी आणि घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून ३ दुचाकी २ लॅपटॉप असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश कोटवाल याने बारावीनंतर मॅकेनिकलचे शिक्षण घेतले आहे. त्याने युट्युबवर व्हीडीओ पाहून दुचाकी चोरल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवलदार विनोद भंडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्वल मोकाशी, शिवा गायकवाड, समीर बागसिराज, दत्तात्रय पवार, सुमित मोघे, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.