गेल्या 4 वर्षापासून फरार असलेल्या सदाशिव पेठेतील आरोपीला पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट एकाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

सुमित नाना वैराट (वय ३० रा. ४४३ सदाशिव पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात पाहिजे आरोपी तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट एककडून हद्दीत गस्त घातली जात असताना पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना बतमीसारमार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दाखल गुन्ह्यात फरार असणारा गुन्हेगार सुमित हा वैकुंठ स्मशान भूमीजवल आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथे सापळा रचून अटक केली. त्याच्यावर ऐकून 5 गुन्हे दाखल असून, तो एका गुन्ह्यात फरार होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like