राज्यपालांच्या दौर्‍याचे चित्रिकरण करणार्‍यास अटक

पुणे , पोलीसनामा ऑनलाईन : राज्यपालांच्या दौर्‍यावेळी वाहनांचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करणार्‍या तरुणाचा मोबाईल घेतल्यानंतर त्याने पोलीसा सोबत हुज्जत घातली. त्याला पोलीसांनी अटक केली. येरवडा परिसरात ही घटना घडली. प्रितम अरूण गायकवाड (वय 39, रा. येरवडा)असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी ए. ए. पडोळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे दौर्‍यावर होते. त्यानिमित्त पोलीसांचा बंदोबस्त होता. फिर्यादी व त्यांचे सहकारी आंबेडकर चौकात तैणात होते. यावेळी वाहनांचा ताफा जाणार असल्याने काही वेळ वाहने थांबविली होती. त्यादरम्यान, प्रीतमने मोबाईलमध्ये परिसरातील वाहनांचे चित्रीकरण केले.

हा प्रकार लक्षात येताच सुरक्षिततेच्या कारणास्तव सहायक निरीक्षक बलभीम ननवरे यांनी प्रीतमचा मोबाईल काढून घेतला. त्याचा राग आल्यामुळे प्रीतमने पोलिस कर्मचारी पडोळे यांच्याशी अपशब्द वापरून हुज्जत घातली. त्यांच्या गळ्यातील ओळखपत्राची दोरी ओढली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ननवरे यांच्या अंगावर धावून जात अपशब्द वापरले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com