‘थर्टी फस्ट’ला ‘झिंगाट’ होऊन महिलेचा पाठलाग करून काढली ‘छेड’, इंजिनिअरींगच्या 2 विद्यार्थ्यांना पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – थर्टी फस्टच्या रात्री पतीसोबत दुचाकीवरून घरी निघालेल्या महिलेचा कारने पाठलाग करून छेडछाड काढणारे इंजिनिअरिंगचे विध्यार्थी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.

ज्ञानेश्वर राधाकिसन राक्षे (वय २०, रा. साई पार्क सोसायटी, लोहगाव), अजय मधुकर मिसाळ (वय २२, रा. डी. वाय पाटील रस्ता, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. मिसाळ हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून फरार आरोपी देखील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. टुर्स व ट्रॅव्हल्सला लावलेल्या कारच्या चालकाने मित्रांना सोबत घेऊन हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी उंड्रीत येथील १९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व तिचा पती थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी लष्कर भागात आले होते. थर्टी फस्ट साजरा केल्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास ते दुचाकीने परत घरी जात होते. एनआयबीएम चौकातून ते उंड्रीकडे दुचाकीवरून जात असताना एका कारमधून चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला.

आरडा-ओरडा करत महिलेच्या चालत्या कारमधून जवळ येऊन आरोपी तिच्या अंगाला हात लावू लागले. त्यामुळे महिला व तिचा पती घाबरले. महिलेने तिच्या दीराला फोन करून कारमधील व्यक्ती पाठलाग करून त्रास देत असल्याचे सांगितले. महिलेचा दीर आल्यानंतर आरोपी पळून गेले होते. तसेच, जाताना कार दीराच्या पायावरून गेल्यामुळे ते जखमी झाले होते.

याप्रकरणी स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस तपास करत होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त विजय चौधरी यांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक युनिट पाचच्या पथकाने कारचा क्रमांक शोधला. त्यावेळी कार टुर्स व ट्रॅव्हल्ससाठी ही लावली असल्याचे समोर आले. कारच्या मालकाची माहिती काढली. त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी कारचा चालक राक्षे असल्याचे समजले. तर, त्याचे तीन मित्र इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील कार जप्त केली आहे. तर, दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/