Pune : पोलिसांना गुंगारा देणार्‍या वेगवेगळ्या गुन्ह्यातील तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पोलिसांना गुंगारा देऊन फिरणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून अटक केली. त्यात गेल्या आठ वर्षांपासून फरार असणाऱ्या दोघांचा समावेश आहे.

विकास अनिल जाधव (वय 23) व आदित्य दिपील खुडे (वय 22, रा. जाधव नगर, कात्रज) व ऋषीकेश उर्फ खाज्या राजेंद्र कुंभार (वय 26, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

विकास व आदित्य हे सिहगड रोड पोलीस ठाण्यातील आर्म ऍक्टच्या गुन्ह्यात गेल्या आठ महिन्यापासून फरार होते. दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या आहेत. यावेळी कर्मचारी किशोर वग्गू आणि चेतन मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गेल्या आठ महिन्यापासून फरार असणारे दोघे निंबाळकर वस्तीजवळ थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून त्यांना पकडले.
तर गेल्या आठ वर्षांपासून कुंभार हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती पोलीस कर्मचारी चेतन मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.