Pune : भारती विद्यापीठ परिसरातील त्या खूनप्रकरणी 3 सराईत गुन्हेगारांसह इतर 4 अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारती विद्यापीठ परिसरात “त्या” खुनप्रकरणात तबल चार अल्पवयीन मुलांचा अन त्यांच्या 3 सराईत गुन्हेगार यांचा सहभाग समोर आला असून, पूर्ववैमनस्यातून या टोळक्याने कुऱ्हाड आणि तलवारीने सपासप वार करत खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिघांना अटक करत 4 अल्पवयीन मुलांना पकडले आहे. शहरात कडक लॉकडाऊन आणि पोलिसांची कडक गस्त असताना या टोळक्याने निर्घृण हत्या केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

सचिन तानाजी वाघमारे (वय 22, रा. कात्रज), सोमनाथ दत्तात्रय गाडे (वय 25) आणि हेमंत उर्फ तुषार जालिंदर सरोदे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत संग्राम गुलाब लेकावळे (वय 19) या तरुणाचा खून झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला खून झालेल्या तरुणाने 6 महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. तर तो 16 नंबर रिक्षा स्टॅण्ड परिसरात या अल्पवयीन मुलाला बसल्यानंतर तसेच जाता येता डोक्यात मारहाण करत असे. तर त्याला आणखी एकदा तुला मारणार अश्या धमक्या देत असत. दरम्यान अल्पवयीन मुले आणि तीन आरोपी ओळखीचे आणि एकच परिसरातील आहेत. तिघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आर्म ऍक्ट आणि दरोडा असे गुन्हे दाखल आहेत. सतत होणाऱ्या मारहाणीमुळे या अल्पवयीन मुलाने हा प्रकार या तिघांना सांगितला.

त्यानंतर या आरोपींनी दोन दिवसांपूर्वी रात्री आंबेगाव पठार परिसरात गणराज चौकाजवळ या तरुणाला गाठून पुन्हा वाद घातला. त्यानंतर त्याच्यावर या तिघांनी आणि त्यांच्या चार अल्पवयीन मुलाणी कुऱ्हाड व तलवारीने सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर हे आरोपी परिसरातून पसार झाले. रात्री नऊ ते साडे या वेळेत हा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. यादरम्यान प्रणव संकपाळ व शिवदत्त गायकवाड यांना आरोपी हे बाहेर गावी पळून जाण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पुणे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून पकडले. तर चौघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी या तीन सराईत गुन्हेगारांच्या मदतीने खून केला असल्याची माहिती दिली. त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

शहरात लॉकडाऊनच्या काळात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने खून झाल्याने कडक निर्बंध आणि पोलिसांची चेकिंग पॉईंट तसेच गस्त यावर प्रश्न चिन्ह आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रसाद पासलकर व त्यांच्या पथकाने केली आहे.