दिवसा ‘बुलेट राजा’ अन् रात्री ‘चोर राजा’, अखेर पुणे पोलिसांच्या ‘जाळ्यात’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसा बुलेटवरून परिसरातील बंद घरांची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या बुलेट राज्याच्या गुन्हे शाखा युनिट -4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. गजानन अर्जुन पाटील (वय-25 रा. गवळी वाडा, वडगाव शेरी, मूळ रा. जामनेर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली बुलेट (एमएच 05 डीसी 4859) जप्त करण्यात आली आहे.

https://youtu.be/Z9EGvWUakRA

पुणे शहरामध्ये बुलेटवरून फिरून बंद घरातील किंमती वस्तूवर डल्ला मारणाऱ्या बुलेट राजाला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. आरोपी गजानन पाटील याने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी केली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी बुलेटवरून परिसरात फिरणाऱ्या व्यक्तीचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला.

आरोपीने गुन्हा केल्यानंतर मूळ गावी जामनेर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने जामनेर येथे जाऊन शोघ घेतला असता तो संगमनेर येथे गेल्याची माहिती मिळाली. संगमनेर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील दोन लाख दहा हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांकडे स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्दमाल आणि गुन्ह्यात वापरलेली बुलेट जप्त केली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी अशोक शेलार, सागर घोरपडे, जितेंद्र तुपे, सुरेंद्र साबळे, सचिन ढवळे, शंकर संपते, शंकर पाटील, शितल शिंदे, अतुल मेंगे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम, राकेश खुनवे, हनुमंत बोराटे यांच्या पथकाने केली.

Visit – policenama.com