मौज मजेसाठी दुचाकी चोरणारा पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पाच गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आकाश राजू पवार (वय-२० रा. लक्ष्मी रस्ता, तिरंगा मित्र मंडळाजवळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हडपसर पोलीस हद्दीमध्ये गस्त घालत असताना रविवारी (दि.७) सायंकाळी पाचच्या सुमारास आकाश पवार हा दुचाकीवरून जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवून गाडीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे असलेल्या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपी पवार हा सराईत दुचाकी चोर असून त्यांने बंडगार्डन, लोणीकाळभोर आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून गुन्ह्यातील दोन लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते, पोलीस हवालदार युसुफ पठाण, संपत औचरे, राजेश नवले, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पोटे, पोलीस शिपाई अनिल कुसाळकर, अकबर शेख, अमित कांबळे, गायकवाड, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ