पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे महागडी दुचाकी चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महागड्या यामाहा आर-1 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रास्तापेठ पुणे येथे करण्यात आली. आरोपीने दुचाकी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपी अश्रफ मुजावर याला अटक करून वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस नाईक टिळेकर, पोलीस शिपाई सचिन पवार सुमीत खुट्टे, निलेश साबळे हे वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक व्यक्ती नेहरूनगर रोडवरून यामाहा आर-1 दुचाकीवरू भरधाव वेगात जाताना दिसला. दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आल्याने दुचाकी अडवून त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

आरोपीला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. आरोपीने दुचाकी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असून आरोपीला वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –