वाहन चोरट्याला पकडले, चार दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केले. त्याच्याकडून ९५ हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजकुमार ओमकार आपचे (रा. हिंगणेमळा, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन कर्मचाऱ्यासह गस्त घालत होते.

त्यावेळी दुचाकीवर निघालेल्या एकावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी राजकुमारला अडवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्याने केशवनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. राजकुमारने मुंढवा, फरासखाना, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, कैलास चव्हाण, संदेश काकडे, दत्तात्रय विभुते, दीपक कांबळे, दीनेश राणे यांच्या पथकाने केली.