पुणे : वर्षापासून फरार पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  चोरी प्रकरणात गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्यास पोलिसांनी अटक केली. राजूमुसुदिन हफीज खान (वय ३०, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात 2011 मध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तो गेल्या नउ वर्षांपासून तो पोलिसांनी गुंगारा देत होता. दरम्यान सराईत गुन्हेगारांची माहिती काढत असताना एक फरार वाकड परिसरामध्ये लपून राहत असल्याची माहिती खडकी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक शफील पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

—चौकट–

बोपोडीत तडीपार सराईताला अटक

खडकी परिसरात विविध गुन्ह्यातील तडीपार सराईताला पोलिसांनी अटक केले. आशिष संजय लोखंडे (वय २३ रा, बहिरट चाळ, बोपोडी ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. सराईत संजय लोखंडे याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. दरम्यान तो बोपोडीतील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.