पुण्यात महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वीज बील थकीत असल्याने महावितरणने घरगुती मिटर कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हा प्रकार सोमवारी (दि.18) नातावाडी येथील विद्यामंदिरच्या समोर सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

देवश गणपत आल्हाट (वय-45 रा. घर नं. 20, विद्यामंदिरच्या समोर, नातावाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक अभिंयंता संध्या पाटील (वय-28 रा. आकुर्डी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवश आल्हाट यांचे वीज बिल थकीत असल्याने त्यांना वीज बील भरण्यास सांगितले होते. तसेच वीज बील भरेल नाहीतर मिटर कनेक्शन तोडणार असल्याची कल्पना दिली होती. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सहाय्यक अभियंता संध्या पाटील या आपल्या कर्मचाऱ्यांसह आल्हाट यांच्या घरी गेल्या होत्या.

वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आल्हाट यांचे मिटर कनेक्शन तोडले. मिटर कनेक्शन तोडल्याच्या रागातून देवेश आल्हाट यांनी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. तसेच संध्या पाटील आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांनी धमकी देऊन ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सहाय्यक अभियंता संध्या पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी देवेश आल्हाट याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. लाड करीत आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like