पुण्यातील PMPML बसमध्ये चोरणार्‍या करणारा वानवडी पोलिसांच्या जाळ्यात, 3 गुन्हे उघड

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल प्रवासादरम्यान नागरिकांच्या मौल्यवान वस्तू चोरणार्‍यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नारायण बळीराम हंगरगे (वय 35, रा. जवळगा, निलंगा, लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरातून वाहन चोरी, घरफोड्यां तसेच इतर चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बसमधील चोर्‍याही वाढल्या आहेत. काही केले तरी या टोळ्या पोलिसांना सापडत नसल्याचे वास्तव आहे. ज्येष्ठ महिला, तरूणी तसेच ज्येष्ठ नागरिक या चोरट्यांच्या केंद्रस्थानी आहेत.

या पार्श्भूमीवर गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांना गस्त वाढवून या चोरट्यांना पकडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तत्पुर्वी वानवडी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना फातिमानगर बसस्थानकावर संशयित चोरटा थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नारायणला ताब्यात घेतले. चौकशहीत त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिील पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 90 हजारांचे दागिने जप्त केले आहेत.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक सलीम चाउस, दत्तात्रय तेलंगे, ज्ञानदेव गिरमकर, शिरीष गोसावी, गणेश खरात, सुदर्शन बोरावके, युवराज दुधाळ यांच्या पथकाने केली.