दोन वर्षापासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या तयारी आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने अटक केली. ही कारवाई युनिट-४ च्या पथकाने कुर्ला पुर्व येथील श्रमीक नगर येथे केली. गणेश अंकुश घोरपडे (रा. वरुर, शेवगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश घोरपडे हा दोन वर्षापासून पुणे पोलिसांना गुंगारा देत होता.

चंदननगर हद्दीतील खराडी येथील अ‍ॅस्किस बँकेमध्ये दरोडा टाण्याच्या प्रयत्नात असाताना चंदननगर पोलिसांनी चार जणांना १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पकडले होते. तर गणेश हा फरार झाला होता. फरार झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना गुंगार देत होता. आरोपी गणेश घोरपडे याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगणे, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गणेश हा मुंबईत लपून बसला असल्याची माहिती युनिट-४ चे पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मुंबई येथे जाऊन तपास केला असता आरोपी कुर्ला पुर्व मधील श्रमिक नगर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने श्रमिक नगरमध्ये सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४चे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, शंकर पाटील, पोलीस नाईक सुरेंद्र साबळे, सचिन ढवळे, पोलीस शिपाई दत्तात्रय फुलसुंदर यांच्या पथकाने केली.

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा