पुणे : सांगवीत तरुणाला सिमेंटच्या गट्टुने मारहाण, मुख्य आरोपी गजाआड

पुणे/सांगवी : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणातून चौघांनी एका तरूणाला सिमेंटच्या गट्टुने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे तर त्याचे इतर तीन साथीदार फरार आहेत. ही घटना बुधवारी (दि.11) सांयकाळी साडेपाचच्या सुमारास नवी सांगवीतील एम.के. चौकात घडली.

ओकांर किसन शिंगारे (वय-19 रा. गांगार्डे नगर, काटे पुरम चौक, पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रसाद सोनटक्के, प्रथम धरमे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रसाद सोनटक्के याला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमके चौकातील एका पान टपरीजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी मागिल भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी ओंकारसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रसाद सोनटक्के याने ओंकारला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच इतरांनी ओंकारला शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने डोक्यात आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच कोयत्याचा धाक दाखवला. पोलिसांनी सिमेंटचा गट्टू आणि कोयता जप्त केला असून मुख्य आरोपी प्रसाद सोनटक्के याला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. निकुंभ करीत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/