सराईत गुन्हेगाराचा खून करणारे पाच अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून करुन फरार झालेल्या पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या रागातून खून केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

मंगेश शाम केदारी (२१), अवधूत साईनाथ लांगे (२१), अमित मारुती टिळेकर (२५), शुभम दिलीप परंडवाल (२२) आणि प्रतीक तुकाराम बजबळे (१९, सर्व रा. देहूगाव माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. शंकर दत्तात्रय बाळसराफ (३५, रा. देहूगाव माळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि आरोपींची जुनी भांडणे होती. एकावर चाकूने वार केल्याच्या गुन्हयात तो कारागृहात होता. त्यापूर्वी त्याने कारागृहातून बाहेर येताच एकाला तरी ठार मारणार असल्याची धमकी दिली होती. मागील काही दिवसांपूर्वी शंकर कारागृहातून बाहेर आला. तो सोबत चाकू घेऊन आरोपींची शोधत देहूगावातून फिरत होता. याची आरोपींना कुणकुण लागली होती. त्यामुळे नऊ जणांनी मिळून शंकर याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला भर रस्त्यात मारले. त्यानंतर आरोपी पळून गेले.

अमोल विजय बाळसराफ यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देहूरोड पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, या खून प्रकरणातील पाचजण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावात असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास जाधव आणि चाकण पोलिसांनी वरील पाच जणांना एका दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !