‘ब्रँडेड’ कपडे आणि महागड्या ‘कार’ चोरणारे चार जण पुणे पोलीसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ब्रँडेड कपडे आणि महागड्या कारची चोरी करणाऱ्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आणि मंचर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पुरुषांचे ब्रँडेड कपडे आणि दोन महागड्या कार असा एकूण ६ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जितेंद्रकुमार चंम्पालाल जैन (वय ३४ रा. ओडवाडीया मोहल्ला वुसी ता.रानी जि.पाली राजस्थान), राजेंद्रसिंग राजपूरोहीत (रा.सिरोई राजस्थान), धोलारम ऊर्फ दिलीप चौधरी (रा.बूसीगाव तारानी जिपाली राजस्थान), तेजाराम (रा.मारवाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे इतर तीन साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

भारती विदयापीठ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे अधिकारी महेंद्र पाटील व त्यांची टिम पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोंलिंग करत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुंबई बेंगलोर हायवेवरील भूमकर चौकाकडून आंबेगाव बु. कडे जाणारे सर्व्हिस रोडवर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार थांबलेली आहे. त्यामधील इसम हा गाडीची नंबर प्लेट बदलत आहे अशी बातमी मिळाली. तपास पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर साथीदारांनी १५ दिवसापूर्वी जुन्नर परिसरातुन एक सेन्ट्रो कार चोरी केली. त्यानंतर चेारलेल्या सेन्ट्रो कारमधुन नऱ्हे परिसरात रात्रीच्या वेळी एका कपडयाचे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन दुकानातील पुरुषांचे ब्रॅडेड कपडे चोरी केले असल्याची कबुली दिली.

आरोपी हे घरफोडी करण्यासाठी चारचाकी कारची चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकड्न चोरी केलेले कपडयापैकी १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे ब्रॅडेड कपडे, १ लाख ५० हजार रुपये किंमतीची सेन्ट्रो कार आणि ४ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझाईन् कार असा एकुण ६ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव भण्डलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, शिवा गायकवाड यांचे पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान