गोडावूनमधून २५ लाखाचे सामान चोरणारी टोळी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक सामानाचे गोडावून फोडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गजाआड केले. घरफोडीचा प्रकार ८ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला होता. पोलिसांनी सहा जणांना अटक करुन गुन्ह्यात चोरलेला २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज (वय-२० रा. मंगळवार पेठ मुळ रा. उत्तर प्रदेश), विनयकुमार विरेद्रनारायण सरोज (वय-२० रा. पाटील ईस्टेट झोपडपट्टी, मुळ रा. उत्तर प्रदेश), राहुल रामसजीवन सरोज (वय-१९), निरजकुमार मेघाई सरोज (वय-१९), सुनिलकुमार शामसुंदर सरोज (वय -२४) आणि अरविंदकुमार प्यारेलाल सरोज (वय-२० रा. मंगळवार पेठ, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपींना गजाआड केले.

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुन्ह्यात वापरलेला पॅगो टेम्पो मिळाला. चालकाकडे चौकशी केली असता टेम्पो प्रतापगड आणि उत्तर प्रदेशातील साथिदारांनी चोरून या गुन्ह्यात वापरला. चोरी करताना टेम्पोचा मुळ नंबर (एमएच १२ क्युआर ७८२४) यामध्ये बदल केला. तसेच टेम्पो चोरीचा असल्याचे समजू नये यासाठी टेम्पोचा रंग बदलला. गोडावूनमधील सामान चोरून नेताना पुन्हा टेम्पोचा मुळ नंबर टाकला असल्याचे चालकाने चौकशीत सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालासह टेम्पो, सहा मोबाईल असा एकूण ३० लाख ६० हजार ८७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उप निरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बदगुडे, हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी सुधाकर माने, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, तुषार खडके, इरफान मोमिन, प्रशांत गायकवाड, योगेश जगताप, तुषार माळवदकर, हनिफ शेख, बाब चव्हाण, अनिल घाडगे, संजय बरकडे, वैभव स्वामी, अशोक माने, सुभाष पिंगळे, अमोल पवार, प्रकाश लोखंडे, सचिन जाधव, अजय थोरात यांनी केली.

आरोग्यविषयक वृत्त –

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’