वाहनांची तोडफोड करणार्‍यांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर येथील माळवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. माळवाडी परिसरात दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. ही कारवाई साडेसतरानळी येथील गार्डनजवळ करण्यात आली.

विकी सुरेश राठोड (वय-२४ रा. मांजरी बुद्रुक, मुळ रा. यवतमाळ), रविंद्र उत्तम भुजबळ (वय-३१ रा. भुजबळ वस्ती, हडपसर), सोहित राजाराम तुपे (वय-२३ रा. साडेसतरानळी, हडपसर), रविंद्र मारुती चक्के (वय-२५ रा. हडपसर), विशाल रामलिंग खुने उर्फ विकी (वय-२५ रा. पाण्याच्या टाकीजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

माळवाडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी साडेसतरानळी येथील गार्डनजवळ उभे असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला असता आरोपींना पोलिसांची चाहूल लागली. आरोपी पळून जात असताना पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींचा पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोड केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते, पोलीस हवालदार युसुफ पठाण, प्रताप गायकवाड, भोजराव, विनोद शिवले, अनिल कुसाळकर, अकबर शेख, अमित कांबळे, नाळे, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या