पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद ; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून २ दुचाकी आणि ३८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अजय रणछोड उर्फ राजु खरे (वय-२० रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

एक इसम कंजार भाट वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर उभा असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलीस शिपाई नवनाथ खताळ आणि नासीर देशमुख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजु खरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबात विचारणा केली असता त्याने दुचाकी त्याचा साथीदार साहील इनामदार याच्या मदतीने जे.एस.पी.एम. कॉलेजच्या पाठीमागून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याची सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ३८ मोबाईल जप्त केले आहेत.

ही कारवाई पुर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस आयुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, रमेश भोसले, पोलीस हवालदार राजु सासगे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, संभाजी दिवेकर, सुधीर सोनवणे, प्रतिक लाहिगुडे, महेश कांबळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –