गणेशोत्सवादरम्यान तळेगाव दाभाडे शहरात तलवार, चॉपर जप्त

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन तलवार आणि दोन चॉपर जप्त करण्यात आले आहेत. ही तळेगाव पोलिसांनी वैष्णवी हॉटेलमागे केली. अनिल गुणवंत म्हस्के (वय-३० रा. लोहारा, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तळेगाव शहरातील गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गणेशोत्सवावर शांततेत पार पडवा यासाठी पोलिसाकडून हद्दीमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. गस्तीदरम्यान वैष्णवी हॉटेलमागे एक व्यक्ती गोणीमध्ये शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपी अनिल म्हस्के याला ताब्यात घेऊन त्याच्या गोणीची झडती घेतली. त्यावेळी गोणीमध्ये धारदार तीन तलवारी आणि दोन चॉपर मिळाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. बी. बाजगीरे, पोलीस हवालदार बी. बी. मारणे, राजेंद्र बोरसे, पोलीस नाईक एम. बी. गुरव, अमोल गोरे, आकाश भालेराव, मिलींद शिंदे, विकास तारू, सतिश मिसाळ, गणेश अंबवणे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –