6 लाखांची चोरीकरून गायब झालेला नोकर अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठाच्या हातातील 6 लाखाचे सोन्याचे कडे घेऊन पोबारा करणार्‍या घर कामगारास हडपसर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून 6 लाखांचे सोन्याचे कडे जप्त करण्यात आले आहे.

किरण अशोक गायकवाड (वय 22, रा. शेवाळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
हडपसर परिसरातील एका प्रतिष्ठीत ज्येष्ठ नागरिकाच्या घरी किरण हा गेली तीन वर्षे काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला होता. तत्पुर्वी फिर्यादींच्या हातात 6 लाखांचे सोन्याचे कडे होते. ते झोपत असताना काढून ठेवत. ही बाब किरण याला माहित होती. काही दिवसांपुर्वी ज्येष्ठ नागरिक झोपत असताना त्यांनी कडे गादी खाली ठेवले. त्याचवेळी किरण याने कडे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण याचा पोलीस शोध घेत होते. परंतु, तो मिळून येत नव्हता. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी आरोपींचा माक काढून पकडण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. शोध घेताना किरण याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने सोन्याचे कडे चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 6 लाख रुपयांचे सोन्याचे कडे जप्त केले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like