पुणे : विसर्जन मिरवणूकीत गणेशभक्तांचे मोबाईल चोरणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे शहरामध्ये नुकतीच गणेशोत्सवाची धामधुम संपली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिक पुण्यात दाखल झाले होते. या नागरिकांमध्ये मोबाईल चोरणारी ११ जणांची टोळी देखील दाखल झाली होती. या टोळीने तब्बल ७६ महागडे मोबाईल फोनची चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. युनिट दोनच्या पोलिसांनी या टोळीला गजाआड करुन ७६ मोबाईल आणि गुन्ह्यात वारलेल्या दोन तव्हेरा गाड्या असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राज्यातून तसेच परदेशातून गणेशभक्त पुण्यात येत असतात. गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये परजिल्ह्यातून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणारी टोळी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना मिळाली होती. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळपासून अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’246d0d1d-c0da-11e8-94ec-af4425ebb3e0′]
रविवारी (दि.२३) रात्री युनिट -२ चे पथक गस्त घालत असताना कुंभारवाडा चौकात दोन संशयित इसम थांबल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दोघांकडे पाच मोबाईल सापडले. मोबाईलबाबात चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांचे आणखी ८ ते ९ साथिदार मोबाईल चोरी करण्यासाठी आले असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी पुणे स्टेशनजवळील मालधक्का येथून दोघांना ताब्यात घेऊन चार मोबाईल जप्त कले. तर विसर्जन मार्गावर गस्त घालून पाच जणांना ताब्यात घेऊन १५ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत आरोपी तव्हेरा गाडीतून पुण्यामध्ये मोबाईल चोरी करण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी एक तव्हेरा गाडी मालधक्का चौकात तर दुसरी गाडी शिवाजी चौकात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी शिवाजी चौकातून दोन्ही गाड्या जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले तसेच गाडी चालकालाही ताब्यात घेऊन ४ मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांचे इतर दोन साथिदार मालेगाव येथे गेल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी युनिट – २ चे एक पथक मालेगावला रवाना करण्यात आले. या पथकाने दोघांना  मालेगाव येथून अटक केली.
गुन्हे शाखेच्या युनीट -२ ने केलेल्या या कारवाईत ११ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७६ मोबाईल आणि दोन तव्हेरा असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -२ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस हवालदार दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, राजू केदारी, किरण पवार, अजय खराडे, पोलीस नाईक किशोर वग्गु, अतुल गायकवाड, विशाल भिलारे, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड, अजित फरांदे, चंद्रकांत महाजन, गणेश नरुटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.