घरफोडी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पार्किंगमधून दुचाकी चोरून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई विश्रांतवाडी परिसरात सपाळा रचून करण्यात आली. रोहित नानासाहेब लंके (वय-२० रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी रोहित लंके याने पाच दिवसांपूर्वी स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरून औंध येथे घरफोडी केल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक आणि पोलीस हवालदार राजु मचे यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट-४ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी लंके हा विश्रांतवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चौकशी दरम्यान त्याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आई-वडील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी

घरफोडी करून चोरलेला मुद्देमाल तो आपल्या आई-वडीलांना देत होता. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या आई-वडिलांना देखील अटक करण्यात आली असून सध्या ते येरवडा जेल येथे आहेत. आरोपी घरफोडी करण्यासाठी अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीने चतु:श्रृंगी आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे, युनिट ४ चे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक, पोलीस कर्मचारी राजु मचे, शंकर पाटील, गणेश साळुंके, दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, विशाल शिर्के, राकेश खुनवे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like