कोरेगाव पार्कमधील ‘टॉप’च्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या ९ ‘बड्या’ व्यापाऱ्यांना अटक ; मित्तल,अगरवाल, गोयल, गुप्ता आणि पारेख यांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क परिसरातील एका उच्चभू हॉटेलमध्ये सुरु असलेल्या पोकर या जुगारावर पोलिसांनी छापा घालून ९ बड्या व्यापाऱ्यांना अटक केली. छापा घातल्यावर रुममध्ये विदेशी दारूच्या बाटल्या, तीन हुक्का पॉट व मोठी रोख रक्कम पोलिसांना आढळून आली आहे. या कारवाईमुळे पुण्यातील व्यापाऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आशिष सतीश मित्तल (रा. विमाननगर), ऋषभ मदन गुप्ता (रा. विमाननगर), आदित्य सूर्यप्रकाश अगरवाल (रा. औंध), आशिष नंदकिशोर अगरवाल (रा.मार्केटयार्ड), गौरव सूरज अगरवाल (रा. उंड्री), अभिषेक संतोष अगरवाल (रा. सोपानबाग), सूरज सुशील गोयल (रा. मार्केटयार्ड), गोविंद लक्ष्मीकांत पारेख (रा.एनआयबीएम रोड) आणि जयेश मोहन गुप्ता (रा. कल्याणीनगर) अशी अटक केलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हॉटेल ‘मींट’ येथे काही जण पैशावर पोकर जुगार खेळत आहे़ या माहितीवरुनकोरेगाव पार्क पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता हॉटेल मींट येथील रुम नंबर
३०९ वर छापा टाकला त्यावेळी तेथे हे ९ व्यापारी पोकर जुगार खेळत असताना मिळून आले.

पोलिसांनी पोकर रेंज नावाचे जुगाराचे साहित्य असलेली आयताकृती पेटी,विदेशी दारुची बाटल्या, तीन हुक्का पॉट व रोख रक्कम असा ३२ हजार ४९० रुपयांचा माल जप्त केला आहे. हे सर्व जण पुण्यातील व्यापारी आहेत. तसेच हॉटेल मींटचे मालकव मॅनेजर यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाई मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या लोकांची आज रविवारी जामिनावर मुक्तता झाली की नाही याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फोन केला असता साहेबच माहिती देऊ शकतील असे सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या