आणेवाडी टोल नाक्यावर गोळीबार करणारे रोहीदास चोरगे टोळीचे २ सदस्य गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आणेवाडी टोल नाक्यावर टोलवरून झालेल्या वादातून कुख्यात गुन्हेगारांनी गोळीबार करत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. गोळीबार करून फरार झालेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून अटक करण्यात आली आहे. लहु जनार्धन माने (वय-३६ रा. सुखसागर नगर, कात्रज) आणि भगवान महादेव खुटवड (वय-४५ रा. भारती विद्यापीठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे कुख्यात गुन्हेगार रोहीदास चोरगे टोळीचे सदस्य असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आणेवाडी टोल नाक्यावर टोलच्या वादातून २५ मार्च २०१९ रोजी आरोपी आणि टोलवरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले होते. याच वादातून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून गोळीबार केला होता. भुईज पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक केली होती तर रोहिदास चोरगे याच्यासह काही गुन्हेगार अद्याप फरार आहेत.

आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करणारे आरोपी कोंढवा येथील टिळेकर नगर इस्कॉन चौकात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी रोहीदास चोरगे, सोपान चोरगे, लक्ष्मण लेकावळे, हरगुणे आणि इतर साथीदार कोल्हापूरहून देवदर्शन करून पुण्याकडे परतत असताना आणेवाडी टोलनाक्यावर वाद झाले होते. याच वादातून गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या लहु माने यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन तर बिबववेडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपींना सातारा येथील भुईज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक अरूण वायकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी योगेश जगताप, अजय थोरात, अनिल घाडगे, अमोल पवार, वैभव स्वामी, सुधिर माने, बाबा चव्हाण यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !