मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोनजण पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज तळ्याजवळ केली. तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी एकूण २ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

शंभु राजेंद्र खवळे (वय-२० रा. खजुरेवस्ती, दर्गा समोर, हडपसर) आणि निलेश मिटु कदम (वय-१९ रा. खंडोबा मंदिराजवळ, थेऊरगाव मुळ रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश चिचंकर व अभिजीत जाधव यांना दोन इसम गाडीच्या नंबर प्लेटवर चिखल लावून शेलार मळ्याकडून कात्रज तळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कात्रज तळ्याजवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची कागदपत्र मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २५ हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही दुचाकी भानुदास धोत्रे (वय ४० रा. खंडाळा, जि. सातारा) आणि सुनिल जाधव यांच्याकडून जप्त करण्यात आली.

ही कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे विष्णु ताम्हाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, गणेश चिचंकर, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, राहुल तांबे, सचिन पवार, योगेश सुळ यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like