दोन सराईत वाहन चोर पुणे पोलिसांकडून गजाआड ; ६ लाखांच्या २६ दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे गुन्हे शाखा युनिट २ आणि ३ च्या पथकाने दोन सराईत वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. युनिट २ ने केलेल्या कारवाईत संतोष शिवराम घारे (वय-३३ रा. ओझर्डे, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर युनिट ३ च्या पथकाने रविंद्र सखाहरी कानडे (वय-३८ रा. कोल्हार, अहमदनगर) याला अटक करून ३ लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.

पुणे शहर आणि परिसरात वाढत असणाऱ्या वाहन चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांचा गुन्हे शाखा युनिट २ आणि ३ चे पोलीस अधिकारी कर्मचारी शोध घेत आहेत. गुन्हेगारांचा शोध घेत असताना युनिट ३ च्या पथकला दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार कानडे हा खडकी येथील मुळा रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कानडेला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट – २ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारांचा शोध घेत असाना रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष घारे साधू वासवाणी चौकातील पेट्रोल पंपासमोर थांबला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घारेला अटक करून सखोल चौकशी केली. पोलिसांनी त्याने चोरलेल्या ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.

रविंद्र कानडे याने पुणे शहर, पिंपरी, संगमनेर, अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर संतोष घारे याने पुणे शहरातील शिवाजीनगर, लष्कर, बंडगार्डन, चतु:श्रृंगी, बिबवेवाडी तसेच इंदापूर येथून दुचाकी चोरल्या आहेत. रविंद्र घारे हा सराईत दुचाकी चोर असून २०१७ साली त्याच्याकडून ४० वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. तो दोन महिन्यापूर्वीच जामीनावर सुटला असून बनावट चावीने दुचाकी चोरून पत्नी, मुलगी आजारी असल्याचे सांगून दुचाकी ५ ते १० हजार रुपयांना विकत होता.

ही कारवाई गुन्हे शाखेच अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजकुमार किद्रे पोलीस कर्मचारी रोहिदास लबाडे, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, कैलास साळुंखे, संदीप राठोड, अतुज साठे, सुजीत पवार, नितीन रावळ तर गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like