गांजा तस्कर पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे येथून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ६४ हजार ५०० रुपयांचा ४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शिवाजीनगर येथील ठुबे पार्क समोर करण्यात आली. अनिल निवृत्ती चव्हाण (वय-३२ रा. रावेर, ता.जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

धुळे येथील गुन्हेगार पुण्यामध्ये गांजाची विक्री करण्यासाठी आला असून तो ठुबे पार्क येथे थांबला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी रमेश चौधर व निलेश शिवतारे यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६४ हजार ५०० रुपयांचा ४ किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, निलेश महाडिक, युनिट ४ चे पोलीस कर्मचारी रमेश चौधर, निलेश शिवतरे, गणेश साळूंके, हनुमंत बोराटे यांच्या पथकाने केली.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या