Pune Police | सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने देशातील 1380 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदकांची (Medals) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) 67 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 3 पोलिसांना (Maharashtra Police) राष्ट्रपती पदक (president’s police medal for gallantry) जाहीर झाले आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेचे (Pune Crime Branch) सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ मधुकर देशमुख (Assistant Commissioner of Police Surendranath Deshmukh) यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक (police medal for meritorious service) जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील 67 पोलिसांपैकी 25 जणांना शौर्यासाठी पोलीस पदक (police medal for gallantry),
3 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 39 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक
(police medal for meritorious service) देण्यात येणार आहे.
पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले आहे. देशमुख यांनी मुंबई शहर, पुणे शहर, सांगली, पुणे ग्रामीण, औरंगाबाद शहर, नवी मुंबई येथे कार्यरत असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास केला आहे.
सुरेंद्रनाथ देशमुख आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी मुंबईत कार्यरत असताना 1987 साली कामाठीपुरा येथे उसळलेल्या हिंदु-मुस्लिम दंगलीवर तात्काळ घटनास्थळी पोहचून दंगलीवर नियंत्रण मिळवले होते.

जानेवारी 2008 ते ऑक्टोबर 2009 या कालावधीत TraffiCop या M-Governance
संगणकाची संरचना, जडण-घडण यामध्ये सुरेंद्रनाथ यांनी मोलाची कामगिरी करुन 20 नोव्हेंबर 2009
पासून ‘पथदर्शी प्रकल्प’ (Pilot Project) म्हणून राबविण्यास राज्य शासनाची मान्यता मिळवून प्रकल्प यशस्वीरित्या राबविला होता.
यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा Best Practice in Public Service Delivery हा बहुमान मिळाला होता.

 

Web Title : Pune Police | Assistant Commissioner of Police Surendranath Deshmukh awarded ‘President’s Police Medal’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Independence Day | लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात

MNGL Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती

Pune Crime | कोंढव्यातील तरुणाचा खून करुन फरार झालेल्या 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक