Pune Police | पुण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; महिन्याभरापुर्वी झालं होतं पत्नीचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहर (Pune Police) पोलिस दलाच्या मोटर परिवहन विभागातील (MT) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने (ASI) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या (Pune Police) पत्नीचे महिन्याभरापुर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यामधूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. महाजन हे पुणे शहर पोलिस दलातील मोटर परिवहन विभागात (एमटी) कार्यरत होते. पुणे शहर पोलिस दलात रूजू होण्यापुर्वी महाजन हे लष्करात होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते पोलिस दलामध्ये रूजू झाले होते. आज (सोमवार) दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title : Pune Police | Assistant Sub-Inspector of Police commits suicide by hanging in Pune; His wife had passed away a month ago

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यात बांगलादेशींची घुसखोरी ! मिलिटरी इंटेलिजन्सने दिली पुणे पोलिसांना माहिती, चौकशी सुरु

Pimpri Chinchwad corona | पिंपरी चिंचवडमध्ये एकाच सोसायटीत 43 जणांना ‘कोरोना’ची लागण, शहरात प्रचंड खळबळ

MP Supriya Sule | महाआघाडीतील सर्व नेत्यांना टार्गेट केलं जातंय – सुप्रिया सुळे

WhatsApp आणणार ट्विटर, इन्स्टाग्राम आणि सिंगल अ‍ॅपसारखं खास फीचर !