पुणे पोलिसांच्या ‘सेवा आणि क्रीस्प’ला ऑर्डर ऑफ मेरीट स्कॉच पुरस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या सेवा  व क्रीस्प या दोन प्रकल्पांना उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल ५६ वा राष्ट्रीय ऑर्डर ऑफ मेरीट स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुधवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या सोहळ्यात पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी व पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी स्विकारला.

पुणे पोलिसांनी S. E. V. A. (SERVICE EXCELLENCE AND VICTIM ASSISTANCE) हा उपक्रम १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरु केला. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकाची मदत व्हावी, तसेच त्याला पुणे पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल जाणून घेता यावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची सेवा टॅबमध्ये नोंद ठेवून त्यांची तक्रार ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमाबाबात आतापर्यंत ३६ हजार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़

तर २९ सप्टेंबर २०१८ रोजी CRISP (CRIMINAL INTENSIVE SERVILANCE PROJECT) हा उपक्रम सुरु करण्यात आला़. यात गुन्हेगारांवर सखोल निगराणी ठेवली जाते. बीट मार्शल, तपास पथक, गुन्हे शाखेचे पोलीस दररोज चार गुन्हेगार असे ३० पोलीस ठाण्यांमध्ये १२० गुन्हेगारांना तपासते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहून त्यांच्यावर दबाव येतो़. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी  आतापर्यंत एकूण ८ हजार ४४५ गुन्हेगार तपासले आहेत. तर त्यापैकी ४ हजार ३०५ गुन्हेगार मिळाले आहेत़.

अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्याकडे सेवा योजनेचे समन्वयन आहे. तर क्रिस्पचे सादरीकरण पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी केले आहे. २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्याक्रमात पोलीस आयुक्तांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या वतीने अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी आणि पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रा़ व्ही़ एऩ अलोक, स्कोचचे अध्यक्ष कृणाल चौहान, कार्यकारी संचालक गुरुशरण धंजल यांच्या हस्ते पुरस्कार  स्वीकारला़