मद्यपी दुचाकीस्वारासाठी पुणे पोलीस बनले ‘देवदुत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वत्र नववर्षाचे स्वागत उत्साहात सुरु असताना मात्र खाकी वर्दी रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणारे पोलीसच अपघातग्रस्तांसाठी देवदुत म्हणून धाऊन येत होते. याचा प्रत्यय सोमवारी (दि.३१) शिवणे चौकात रात्री साडेबाराच्या सुमरास आला.

थर्टी फस्टच्या रात्री नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बरेच लोक घराबाहेर पडून आंद लुटत होते. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पुणे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या गस्त वाढवण्यात आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास एक दुचाकीवरील दोन जण दारु पिऊन शिंदे पुल शिवणे ते उत्तमनगर कडे जात होते. शिवणे चौकाजवळील नव भारत हायस्कुल  येथे त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांचा अपघात झाला.

दुचाकीचालकाने त्याचा मित्र आदर्श गावडे (वय-३१ रा. कोरेगांव पार्क) याला जखमी अवस्थेत सोडून निघून गेला. आदर्श गंभीर जखमी झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तर त्याच्या डाव्या पायाचे हाड फॅक्चर झाले होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली. मात्र, त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते.

दरम्यान, उत्तमनगर पोलीस ठाण्यतील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक के.के. कांबळे, पोलीस हवालदार सुर्य़वंशी, पोलीस फौजदार वाळके, सहायक पोलीस फौजदार वायदंडे हे हद्दीमध्य गस्त घालत असताना तेथे पोहचले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना संपर्क करुन अपघाताची माहिती दिली. तसेच १०८ नंबर वर संपर्क साधून रुग्णवाहीका उपलब्ध करुन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाकल केले. अपघातानंतर हजारो लोक त्या ठिकाणावरुन जात होते. मात्र, एक ही व्यक्ती मदतीसाठी पुढे आला नाही. पण पोलिसांनी वेळीच अपघातग्रस्त तरुणाला मदत करुन त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे खाकी वर्दी त्या तरुणासाठी देवदूत बनून धाऊन आली असे म्हणावे लागेल.