Pune Police | पुण्यातील ‘त्या’ 19 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांवर ‘घोर’ अन्याय?, जाणून घ्या प्रकरण

पुणे : नितीन पाटील – सालाबादाप्रमाणे पोलिस महासंचालक कार्यालयाने (DGP Office) पुणे पोलिस आयुक्तालयाकडून (Pune Police Commissionerate) ‘राष्ट्रपती पोलिस पदका’साठी (Presidential Police Medal) विहित केलेले निकष पुर्ण करित असलेल्या शहर पोलिस दलातील उल्लेखनीय / गुणपत्तापुर्ण सेवा केलेल्या पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांच्या नावांचे प्रस्ताव (शिफारस) दि. 11 ऑक्टोबरपर्यंत 2021 पर्यंत मागविले होते . मात्र, शहर पोलिस दलातील (Pune Police) बाबुगिरीमुळे (clerk) झोन-1 आणि झोन-2 मधील तब्बल 19 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांची नावेच पुणे आयुक्तालयाकडून पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिस आयुक्तालयाकडून (Pune Police) 25 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी (Police Officers) आणि अंमलदारांच्या (Policeman) नावांची शिफारस पोलिस महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यालय, वाहतूक शाखा (Traffic Branch), गुन्हे शाखा (Crime Branch), विशेष शाखा (special branch), झोन-3, झोन-4 आणि झोन -5 च्या पोलिसांचा समावेश आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडून (Admin Dept.) प्रत्येक ब्रँच आणि विभागाला निकष पुर्ण करित असलेल्या संबंधित पोलिसांच्या नावांच्या शिफारशी तात्काळ पाठवाव्यात असे सांगण्यात आले होते. दि. 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस महासंचालक कार्यालयास ती सर्व नावे कळविणे गरजेचे होते. मात्र, नेहमीप्रमाणे यंदा देखील नावे कळविण्यास उशिर झाला.

आयुक्तालयाकडून इतर सर्व ब्रँचची माहिती पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तालयाकडे दि. 20 ऑक्टोबरच्या पुर्वी प्राप्त झाली.
साधारण त्याच दिवशी अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये 25 पेक्षा अधिक नावांच्या शिफारशी अंतिम करून त्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली.
त्या बैठकीमध्ये सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt. CP Dr. Ravindra Shisve), अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांच्यासह इतर काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश होता.
दरम्यान, बैठकीपर्यंत झोन-1 आणि झोन-2 मधील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांच्या शिफारशींची यादीच पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडे प्राप्त झाली नाही. त्यामुळे झोन-1 आणि झोन-2 मधील त्या 19 जणांचा विचार देखील बैठकीत झाला नाही. झोन-1 आणि झोन – 2 च्या कार्यालयातील बाबु लोकांकडून यादी उशिरा म्हणजेच दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली. त्याची साधी ‘पोच’ पावती देखील झोन-1 आणि झोन-2 च्या ‘बाबु’ लोकांना देण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

‘बाबुगिरी’मुळे झोन-1 आणि झोन-2 मधील संबंधित 19 पोलिसांवर ‘घोर’ अन्याय झाल्याची चर्चा सध्या पुणे पोलिस (Pune Police) वर्तुळामध्ये आहे.
याबाबतची माहिती काही पोलिस अंमलदारांनी थेट पोलिस महासंचालकांना सोशल माध्यमांव्दारे Social Media (सोशल मीडिया – Facebook and WhatsApp) दिली असल्याचे बोलले जात आहे.
पोलिस दलामध्ये सेवा निवृत्तीच्या वळणावर असताना राष्ट्रपती पोलिस पदकाचं स्वप्न पाहिलं जाते.
अनेक पोलिसांना वर्षानुवर्ष पोलिस दलात राहून कर्तव्य बजाविल्याचं फळ मिळतं तर काही जणांचा पदरी निराशा देखील येते.
अशावेळी निराश झालेले पोलिस पुन्हा दुसर्‍या वर्षी पदकासाठी प्रयत्न करतात.
पण, इथं तर त्यांच्या निशीबाचा फैसलाच बाबुगिरीमुळे ‘अंधार’मय झाला आहे.
झोन-1 आणि झोन-2 मधील संबंधित ‘क्लर्क’ यांनी वेळेत पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडे नावे पाठविली नसल्याने आपल्यावर ‘घोर’ अन्याय झाल्याची भावना संबंधित पोलिस अधिकारी आणि अंमलदारांमध्ये निर्माण झाली आहे.

संधी मिळाल्यानंतर आपण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यावर आपण गर्‍हाणे मांडणार असल्याची भुमिका काही अंमलदार पोलिस कर्मचार्‍यांकडे बोलून दाखवत आहेत.
मात्र, पोलिस महसंचालक कार्यालयात वेळेत माहिती पोहचणे गरजेचे असते.
एकंदरीत सध्यातरी झोन-1 आणि झोन-2 मधील तब्बल 19 जणांवर घोर अन्याय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अगोदरच उशिर झाला होता अन् त्यात त्या वरिष्ठ अधिकार्‍याची ‘घाई-गडबड’

पोलिस महासंचालक कार्यालयाने दि. 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत नावांच्या शिफारशी पाठवाव्यात असे स्पष्ट परिपत्रक दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी काढले होते. असे असताना देखील दि. 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत पुणे पोलिस आयुक्तालयाकडून ‘डीजी’ ऑफिसला माहिती पाठविण्यात आली नाही. दि. 20 ऑक्टोबरला पुणे पोलिस आयुक्तालयाकडून नावांच्या शिफारशीची यादी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तालयाकडून पाठविण्यात आलेल्या यादीत एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव असून त्यांनी यादी पाठविण्यासाठी ‘थोडी’ घाई-गडबड केल्याची चर्चा देखील ‘बाबु’ लोकांमध्ये आहे.
पोलिस दलात एखाद-दुसर्‍यावर अन्याय झाला तर त्याची ‘गावभर’ चर्चा होते मग इथं तर 19 जणांवर ‘घोर’ अन्याय झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे पुणे पोलिस दलात या बाबतची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Police | Big injustice on 19 police officers and policeman in Pune Police Commissionerate?, know the case about President Police Medal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update