पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सायलेन्सरमधून फटाक्यांचे आवाज काढून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांकडून ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) करणाऱ्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत. या विशेष मोहिमेंतर्गत पुणे पोलिसांनी (Pune Police) मागील आठवड्यात जप्त केलेल्या दुचाकींच्या सायलेन्सर (Silencer) वर बुलडोजर चालवला आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of Traffic Rules) केल्याप्रकरणी प्रत्येकी एक हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बुलेटस्वारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पुणे पोलिसांनी (Pune Police) सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात येत असलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनदेखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. पोलिसांनी तब्बल 195 सायलेन्सरवर बुलडोझर चालवला आहे. तसेच कारवाईची मोहीम कायमस्वरूपी सुरूच ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
#Pune, We have a long way to go on this campaign.. but many of you asked for this SPECIAL TREATMENT, so here it is..
मागील आठवड्यात आम्ही जप्त केलेले दुचाकींचे १९५ सायलेन्सर नष्ट केले
✅Action will continue.#NoisePollution pic.twitter.com/LpLoh1AZyX
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 9, 2022
आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बुलेटस्वरांकडून (Royal Enfield) फटाक्यासारखा आवाज काढतात. त्यामुळे पुणे शहरातील फर्ग्युसन रोड (Fergusson Road), जंगली महाराज रस्ता (Jangli Maharaj Road), कॅम्प (Camp), बाजीराव रस्ता (Bajirao Road), डेक्कन (Deccan), शिवाजीनगर (Shivajinagar), स्वारगेट (Swargate), सेनापती बापट रोड (Senapati Bapat Road) या परिसरात पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागकडून (Pune Police Traffic Branch) विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून बुलेटस्वारांना थांबवून पाहणी केली जात आहे. दरम्यान, बुलेटस्वार तरुणांनी स्वत:हून फटाक्यांचे सायलेन्सर काढावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरामध्ये बुलेटस्वार (Bullet) तरुणांकडून सायलेन्सरद्वारे आवाज काढून ध्वनिप्रदूषण केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित हद्दीत पोलीस आणि वाहतूक विभागाकडून मोहीम राबवून बुलेटस्वारांचे सायलेन्सर जप्त केले होते.
त्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta)
यांनी सांगितले. तसेच ही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- Pune Police | bulldozer driven on 200 two wheeler silencer pune police news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट