पुण्यातील शिवाजीनगर परिसरामधील इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 परदेशी महिलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील शिवाजीनगर परिसरात सुरू असणार्‍या इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे सेक्स रॅकेटमध्ये पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची देखील सुटका करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने (एस्कॉर्टिंग) हे सेक्स रॅकेट चालविले जात होते.

याप्रकरणी दलाल मॉन्टी उर्फ जगन्नाथ आर्यल याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक डेक्कन येथे गस्त घालत होते. यावेळी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलजवळ परदेशी महिला थांबली असून तिला वेश्याव्यवसायासाठी मॉन्टी नावाच्या दलालाने पाठविल्याची माहिती पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण आणि संतोष भांडवलकर यांना मिळाली. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर येथे सापळा रचून परदेशी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने मॉन्टी नावाचा दलाल असून, त्याने हिंजवडी भागातील एका हॉटेलमध्ये महिलांना ठेवल्याची माहिती मिळाली. हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी तीन महिला परदेशातील असून त्या मूळच्या कझाकिस्तान आणि उझबेकीस्तानमधील आहेत. सुटका करण्यात आलेल्या अन्य तीन महिलांपैकी एक नेपाळची आहे. दोघी भारतातील आहेत.

आरोपी हा शहरातील पंचतारांकित हॉटेलात नागरिकांना रूम बुक करण्यास सांगत असे. त्यानंतर त्या रूमचा क्रमांक घेऊन खात्री केल्यानंतरच महिलांना येथे पाठवत होता. एकावेळचे तो 15 हजार रुपये घेत असल्याचे माहिती समोर आली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, पुकाळे, शिंदे, माने, करपे, खाडे, चव्हाण, कोळगे यांनी ही कारवाई केली.

एक तरूणी महाविद्यालयातील
पोलिसांनी नेपाळी आणि परदेशातील अशा 6 महिलांची सेक्स रॅकेटमधून सुटका केली आहे. त्यातील एका तरुणी पुण्यातील प्रसिद्ध अशा महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती पैशांसाठी यात ओढली गेल्याचे समोर आले आहे. ती उच्चशिक्षीत आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसही आवक झाले आहेत. त्यांच्याकडे आणखी चौकशी करण्यात येत असून, यातून मोठी लिंक पोलिसांना हाती लागण्याची शक्यता आहे. या सेक्स रॅकेटची इंटरनॅशनल लिंक असल्याचे सांगण्यात येत आहे.