पुणे  :  पोलीस चौकीतच पोलीस शिपायाला धक्काबुक्की

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस चौकी समोर गोंधळ घालणा-या दोघांना पोलीस चौकीत आणले असता या दोघांनी पोलीस चौकीत गोंधळ घालून चौकीतील पोलीस शिपायाला धक्काबुक्की  केली. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली असून एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१५) रात्री पावणे आकराच्या सुमारास बिबवेवाडी पोलीस चौकीत घडला.

शुभम सचिन तनपुरे (वय-१९ रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई टी.एस. सागर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी आणि महिला हे दोघे पोलीस चौकीसमोर गोंधळ घालत होते. त्यावेळी टी.एस. सागर यांनी या दोघांना शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी शुभम तनपुरे याने सागर यांच्या अंगावर धावून जात मारण्यासाठी हात उचलला. या दोघांना चौकीत आणले असता महिलेने आणि शुभम तनपुरे या दोघांनी सागर यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली. तसेच पोलीस चौकीत गोंधळ घातला. सागर हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.