Pune Police Combing Operation | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 34 कोयते, 2 सत्तुर, तलवार जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेच्या (Crime Branch) वतीने ऑल आऊट (All Out) कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन मंगळवारी (दि.24) रात्री 9 ते बुधवार (दि.25) मध्यरात्री दोन या कालावधीत राबवण्यात आले.

 

पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stop), रेल्वे स्टेशन (Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3715 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 650 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 9 हजार 950 रुपयांचे 34 कोयते, 600 रुपयांचे 2 सत्तुर,
एक हजार रुपयांची एक तलवार जप्त करुन 37 आरोपींना अटक केली आहे.
गुन्हे शाखेने 09 आणि पोलीस स्टेशनने 28 असे एकूण 37 केसेस दाखल केले आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station)
हद्दीमध्ये 4 लाख 22 हजार 240 रुपयांचा 21 किलो 112 ग्रॅम गांजा (Marijuana) जप्त करुन अजय बबन होजगे (वय-22 रा. भोसेगाव) याला अटक केली आहे.
तर येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीतून तौफिक शेख उर्फ रकिब शेख (रा. टिंगरेनगर)
याला अटक करुन 2 लाख 3 हजार 800 रुपये किंमतीचे 10 ग्रॅम 190 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (Mephedrone) जप्त केले आहे.
याशिवाय अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station)
हद्दीत 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचा 5 किलो 150 ग्रॅम गंजा जप्त करुन साहिल जयंत मानकर (वय-21 रा. गडचिरोली) याला अटक केली आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील दोन हुक्का पार्लरवर छापे टाकून 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
तसेच जुगार अॅक्ट (Gambling Act) अंतर्गत गुन्हे शाखेने 18 व पोलीस स्टेशनने 14 केसेस करुन 78 आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 99 हजार 365 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याशिवाय या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 592 हॉटेल, ढाबे, लॉज तसेत 171 एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक,
निर्जन ठिकाणे तपासण्यात आली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 1463 संशयित वाहन चालकांना चेक करुन
82 जणांवर दंडात्मक कारवाई करुन 37 हजार 600 रुपयांचा दंड वसुल केला आहे.
तर वाहतुक शाखेने 1061 वाहन चालकांची तपासणी करुन 154 जणांवर 1 लाख 7 हजार 900 ची दंडात्मक कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic Branch DCP Vijayakumar Magar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,
मलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

 

Web Title :- Pune Police Combing Operation | ‘All Out Combing Operation’ of Pune Police in the City on the Background of Republic Day, 34 Koytes, 2 Satturs, Swords Seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य