Pune Police Combing Operation | कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन, 3 हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती; 521 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Combing Operation | महाशिवरात्री, शिवजयंती आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.15) मध्यरात्री शहरात विविध ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडाझडती (Pune Crime News) घेतली. पुणे पोलिसांनी हे कोंबींग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) बुधवारी (दि.15) रात्री 9 ते गुरुवारी (दि.16) मध्यरात्री 2 या वेळेत केले. यामध्ये शहरातील विविध भागात कारवाई करुन 3 हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन 521 जणांना अटक केली.

 

स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील पथकाने वेगवेगळ्या भागात तपासणी मोहीम (Pune Police Combing Operation) राबविली. गंभीर गुन्ह्यातील 521 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या पाच जणांना अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानिया येथील नागरिकाकडून तब्बल 23 लाख 26 हजारांचे कोकेन जप्त (Cocaine) केले. अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) मुंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. पोलिसांनी 538 गुन्हेगारांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.

 

जामीन मिळवून बाहेर आलेल्या आरोपींना पोलिसांनी नोटीस बजावली. पुणे पोलिसांनी राबवलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये 544 हॉटेल,
लॉजची तपासणी केली. तसेच बसथांबे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी करण्यात आली.
याशिवाय शहरातील विविध भागात नाकाबंदी करुन 1 हजार ४८५ वाहनचालकांची चौकशी करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 32 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr)
यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic Branch DCP Vijay Kumar Magar),
सहायक आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar), नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,
अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

 

Web Title : – Pune Police Combing Operation | Combing operation by Pune Police in the background of Kasba by-election, 3 thousand 707 criminals were hunted; 521 people arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)