Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) दरम्यान सराईत गुन्हेगारांची तपासणी करुन प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली. हे कोंबिंग ऑपरेशन शुक्रवारी (दि.12) रात्री 10 ते शनिवारी राबवण्यात आले.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे,
हॉटेल, लॉज, ढाबे, एस. टी व बस स्थानके (Bus Stop), रेल्वे स्टेशन (Railway Station)
तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या मोहीमेत तब्बल 3381 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 547 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 8 हजार 120 रुपयांचे 29 कोयते, 600 रुपयांच्या 2 तलवारी जप्त करुन 35 आरोपींना अटक केली आहे.
तसेच पालघन, खंजीर जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेने 13 आणि पोलीस स्टेशनने 21 असे एकूण 34 केसेस दाखल केले आहेत.

गुन्हे शाखेने (Crime Branch) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अंतर्गत दोन गुन्हे दाखल करुन दोन आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 2 पिस्टल आणि दोन काडतुसे असा एकूण 90 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तर युनिट दोनच्या पथकाने आकाश प्रकाश जाधव (वय – 24 रा. कात्रज) याच्याकडून 1 पिस्टल आणि 1 जिवंत काडतुस असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

 

युनिट पाचच्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी आकाश कांबळे याला अटक केली.
तसेच रोहित पांचागडे याला अटक करुन मोबाईल व मोपेड असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याशिवाय कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल गुन्ह्यातील आरोपी अर्जुन राठोड व गणेश नेपाळी यांना अटक केली.
तर युनिट चारच्या पथकाने चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) दाखल असलेल्या गुन्हातील फरार आरोपी जय विटकर व अनिल विटकर यांना अटक केली.

 

खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) अरुण पवार याला अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जीवंत काडतुस असा एकूण 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी (Anti Narcotics Cell) पथक एकने दिनेश तिवारी याला अटक केली आहे.
आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) पिटा अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात फरार होता.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station)
दाखल मोक्का (MCOCA) Mokka गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल चोरमारे/सातवणकर याला अटक केली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यामार्फत आठ जणांना नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली.

 

पोलीस स्टेशनने मुंबई प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट (Mumbai Prohibition Act) अंतर्गत 18 केसेस दाखल करुन 11 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 24 हजार 829 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीआरपीसी कायदा (CRPC Act) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act)
102 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 419 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.

 

नाकाबंदी कारवाईमध्ये 1671 संशयित वाहन चालकांना चेक करुन 21 जणांवर कारवाई करुन 71 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तर वाहतूक शाखेने 1294 संशयित वाहन चालकांना चेक करुन 1 लाख 16 हजार 100 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranvare), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे (Traffic DCP Rahul Shriram)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोंबिंग ऑपरेशन राबवले.

 

 

Web Title : –  Pune Police Combing Operation | In the wake of Independence Day Pune police combing the trees of criminals 547 criminals are behind bars

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा