pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात जबरी चोऱ्या करणाऱ्या दोघांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता pune commissioner amitabh gupta यांनी मोक्का mcoca (Mokka) कारवाई करत या दोघांची रवानगी कारागृहात केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता pune commissioner amitabh gupta यांनी आतापर्यंत वेगवेगळया गुन्हेगारांवर 36 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. Action under Mcoca against two criminals in Pune

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

दत्तात्रय हनुमंत अलगुडे (वय 28, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन लेन) व अविनाश उर्फ तम्म्या राजू शेट्टी (वय 21) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यावेळी चतुःशृंगी भागात बँकेत पैसे जात असलेल्या तरूणाला अडवून त्याला माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकला असे म्हणत शिवीगाळ करून 34 हजार लुटून नेले होते. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने शोध घेऊन या दोघांना अटक केली होती.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या पथकाने या दोघांवर मोक्का कारवाई करावी.
असा प्रस्ताव तयार करून तो अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना पाठवला होता.
त्याची चौकशी व छाननीकरून दोघावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

Web Title : pune police commissioner amitabh gupta | Action under Mcoca against two criminals in Pune

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई