Pune : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून अचानकपणे बंदोबस्ताची पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू आहेत. पोलीस 24 तास ऑन ड्युटी असून, यानिमित्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज अचानक बंदोबस्ताची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांना सतर्क रहा आणि काळजी घ्या, अश्या सूचना देखील केल्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (शुक्रवारी) विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट दिली. तसेच, येथील बंदोबस्त व परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी काटेकोरपणे नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

याभेटीनंतर आयुक्तांनी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याशी चर्चा केली. तर परिस्थितीची आढावा घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. तसेच बंदोबस्त करत असलेल्या सर्व पोलिसांशी सवांद साधला. तर येथील सर्व पोलिसांची कोरोना चाचणी केल्याची माहिती यावेळी त्यांना उपायुक्त नारनवरे यांनी दिली. आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर आयुक्तांनी मंडई व बेलबाग चौकातील नाकाबंदीची पाहणी केली. बंदोबस्तावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधला. तसेच त्यांना बंदोबस्तावर सतर्क रहा व काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. विश्रामबाग इमारतीची पाहणी केली. परिसर स्वच्छ असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.