पुणे : बदली झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोडण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलीस आयुक्तालयातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश पुणे पोलीस यांनी आज (मंगळवार) दिले आहेत. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील तात्काळ सोडण्यात यावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df00ed83-c0df-11e8-8466-ed55dc6cd8f6′]
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची सुरुवात १५ ऑगस्टला झाली. पुणे पोलीस आयुक्तालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांची पिंपरी-चिंचवडआयुक्तालयामध्ये बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी आज रात्री काढले आहेत. बदली झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली पोलीस ठाणे किंवा शाखेत झाली आहे. त्याच प्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप सोडण्यात आले नाही. अशा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना देखील सोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
[amazon_link asins=’B077B3MXKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a704547-c0e1-11e8-923c-c9bb1408585e’]

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची विभाजनी झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून १८५५ आणि पुणे ग्रामीणकडून ३५२ जणांचे मनुष्यबळ देण्याचे ठरले होते. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी दोन्हीकडून काही बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे शहर पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना अधांतरी ठेवण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री पुणे पोलीस आयुक्तालयातून सहायक फौजदार ते पोलीस शिपाई अशा एकूण १६६९ जणांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये सहायक फौजदार १४३, पोलीस हवालदार ३७५, पोलीस नाईक ४२०, पोलीस शिपाई ७३१ असे एकूण १६६९ पोलीस कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. तर त्यापूर्वी एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक आणि ६७ पोलीस उपनिरीक्षक देण्यात आले होते.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea6a5fef-c0df-11e8-afe6-f38801c5a1e0′]
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अप्पर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून ते सर्वजण हजर झाले आहेत. तसेच पुणे शहर पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी देणे बाकी होते.

पिंपरी : पोलिसांमधील वाईट सवयी संपवणार : पद्मनाभन