Pune Police Commissionerate | पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन-अत्याधुनिक पत्रकार कक्षाचे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) नव्याने तयार करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे (Press Room) उद्घाटन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांच्या हस्ते आज (सोमवार) झाले. यावेळी बोलताना सुधीर गाडगीळ म्हणाले, पोलिसांनी केलेल्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेच असते. पोलीस रात्रंदिवस काम करीत असतात तसेच पत्रकार (Journalist) देखील समाजासाठी काम करत असतात. ही नवी प्रेस रुम पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी व्यक्त केली. (Pune Police Commissionerate)

 

यावेळी पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Additional CP Ramnath Pokale), जालिंदर सुपेकर (Addl CP Jalindar Supekar), एन. डी. चव्हाण (Addl CP N. D. Chavan), राजेंद्र डहाळे (Additional CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), विवेक पाटील (DCP Vivek Patil), सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) आदि उपस्थित होते. (Pune Police Commissionerate)

 

 

सुधीर गाडगीळ म्हणाले की, मी पत्रकार म्हणून काम करत होतो, त्याला आता 50 वर्षे झाली. पत्रकार कक्षाच्या उद्घाटनाला एका पत्रकाराला बोलावले याचा आनंद वाटला. वृत्तपत्रात गुन्हेगारी (Crime News) व राजकीय बातम्यांना (Political News) महत्व असते. त्यामुळे क्राईम हे महत्वाचे बीट आहे. सुरुवातीला मीही हे बीट पाहिले होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, पत्रकार बांधवांनी पत्रकार कक्षाची मागणी केली होती.
सध्या उपलब्ध असलेले सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी केले. सुत्रसंचालन अनिकेत पोटे (Aniket Pote),
नवनाथ शिंदे (Journalist Navnath Shinde) यांनी केले तर, पांडुरंग सरोदे (Journalist Pandurang Sarode) यांनी आभार मानले.

 

Web Title :- Pune Police Commissionerate | Inauguration of new press room at Pune Police Commissionerate Sudhir Gadgil CP Amitabh Gupta Jt CP Dr Ravindra Shisve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, मृत्यूच्या संख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nanded Terrible Accident | दुर्देवी ! नांदेडमध्ये नववधूला घेऊन जाताना भीषण अपघात, नवरीसह 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

 

Chandrakant Patil | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंना थेट मुख्यमंत्री करता येत नसल्याने संजय राऊतांना…’, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान