पुणे पोलिसांकडून २ लाखांचा गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरामध्ये प्लास्टीकच्या बॅगेत साठवून ठेवलेला गांजा खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी सव्वादोनच्या सुमारास वारजे माळवाडी यथील महादेव मंदीराजवळील अमर भारत सोसायटीत करण्यात आली. या कारवाईत एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून २ लाख ३८ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

सुनिता सिकंदर भाट (वय-४७) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक आनंद रावडे यांनी फिर्य़ाद दिली आहे. खंडणी व अंमली विरोधी पथकाचे कर्मचारी सुमीत ताकपीरे आणि पडवाल यांना वारजे माळवाडी येथील एका घरामध्ये गांजा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वारजे माळवाडी येथील अमर भारत सोसायटीतील घरावर छापा टाकला. घरातील खोलीमध्ये एका कोपऱ्यात प्लास्टीकच्या बॅगमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी दोन लाख ३८ हजार रुपये किंमतीचा १५ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करुन सुनिता भाट या महिलेला अटक केली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत जप्त केलेला गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

शांत झोपेसाठी रात्री करा ही ‘आसने’

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’