पुण्यातील पोलिस बनला सोशल मीडियावर ‘हिरो’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियाच्या माध्यमातून एका रात्रीतून स्टार झालेले अनेक उदाहरण आपल्याकडे आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणू मंडल हे त्यातील एक महत्वाचं उदाहरण. लता दीदींचं राणूने गायलेल्या गाण्याला लोकांनी चांगलीच पसंती दिली. त्यानंतर आता सोशल मीडियाचा नवा स्टार समोर आला आहे. पुणे पोलीस दलाचा कॉनस्टेबल सागर घोरपडे हा अत्यंत सुरेल आवाजाचा गायक आहे, आणि त्याने रेकॉर्ड केलेलं गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खाकी वर्दीतल्या सागरच्या आवाजाच प्रचंड कौतुक सुरू आहे.

एखाद्या कसलेल्या गायकाप्रमाणे गाणाऱ्या या खाकी वर्दीतला गायकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं शेअर केलं होत. त्याने विचारही केला नसेल. परंतु चक्क तीनच दिवसात त्याचा हा व्हिडीओ तब्बल १५ लाख जणांनी पाहिला आहे. सागरच्या या गाण्याचे प्रचंड कौतुक होत असून त्याला आणखी गाणी रेकार्ड करून टाकण्याची मागणी केली जात आहे.

मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील मंगळवाडी येथे राहणाऱ्या सागरला घरी कीर्तन आणि हरिनाम सप्ताहात गाण्याची सवय होती. मात्र, 2012 मध्ये पोलीस दलात भरती झाल्यापासून त्याचा आणि स्टेजचा संपर्क तुटला. मात्र एखाद्या कार्यक्रमांवेळी गायलेल्या गाण्यामुळे त्याला अनेक मित्रांनी गात राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने काही गाणी रेकार्ड करत फेसबुकला टाकली, ज्याला यूजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण वर्दीतल्या खात्यात नोकरीला असल्याने त्याने वरिष्ठांची परवानगी घेत पुढची भूमिका ठरवणार असल्याचे म्हंटले आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !