Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Constable Suicide News | पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या (Commit Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या (Pune Police Constable Suicide News) करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात आपल्या भावाजवळ एक आगळीवेगळी मागणी केली आहे. (Pune Crime News)

 

वैभव दिलीप शिंदे Police Constable Vaibhav Dilip Shinde (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे यांच्या मागे पत्नी कांचन, भाऊ आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे पुणे पोलीस दलात (Pune Police Force) मोटार परिवहन विभागात (Motor Transport Department) नियुक्तीला होते. शिंदे हे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेची तयारी करत होते. शिंदे यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. छतावर झाडाची फांदी आलेली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे या फांदीला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

 

शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे.
या चिठ्ठीमध्ये त्यांनी पत्नी कांचन मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा.
माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा, असे शिंदे यांनी चिठ्ठीमध्ये इच्छा व्यक्त केली आहे.

शिंदे यांना मूळव्याधीचा त्रास होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांची मूळव्याधीवरील शस्त्रक्रिया केली होती.
त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

Web Title :  Pune Police Constable Suicide News | Police Constable Vaibhav Dilip Shinde committed suicide by hanging himself in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा