Pune : शहर पोलिस दलात ‘कोरोना’चं थैमान !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाच्या काळात गेल्या सात महिण्यापासून काम करणाऱ्या पुणे पोलिस दलातील तबल 1150 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी ९५० जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर दुर्दैवाने कोरोनामुळे 7 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.

मार्चच्या मध्यंतरी कोरोना संसर्ग आला आणि देश लॉकडाउन झाला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, आरोग्य व पालिका विभाग काम करत आहे. जोखमीचे काम आरोग्य विभागाचे असले तरी पोलीस दल 24 तास रस्त्यावर उतरून काम करत आहे. त्यामुळे त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पुरेपूर काळजी घेऊनही कोरोना होत असल्याचे दिसत आहे. यात कामानिमित्त येणाऱ्या व्यक्ती व रस्त्यावर काम करत असताना येत असलेला संपर्क धोकादायक ठरत आहे.

विशेषतः नाकाबंदी, जनजागृती, पेट्रोलिंग, सामाजिक प्रबोधन, गणेशोत्सव तयारी, बेशिस्तावरील कारवाई, दंडात्मक वसुली ही कामे करताना नागरिकांशी जास्त संपर्क येत. परिणामी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत काम करणाऱ्या तब्बल १ हजार १५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांना मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखावी लागत आहे.

कोरोनाबाधित पोलिसांवर तातडीने उपचारासाठी लवळे परिसरात रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तर काही रुग्णालयात राखीव बेड देखील ठेवले होते. त्याशिवाय ने-आण करण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ९५० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. उर्वरित २०० कर्मचारी व अधिकाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाने आतापर्यंत शहर पोलिस दलातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूूंबियामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like